अलका कुबल यांच्या दोन मुली काय करतात तरी काय? | पुढारी

अलका कुबल यांच्या दोन मुली काय करतात तरी काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अलका कुबल आजही प्रसिध्द आहेत. त्यांनी अनेक सपरहिट चित्रपट दिले. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने डोळ्यातून पाणी काढायला लावलं. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलका कुबल यांनी छोट्या पडद्यावरही काम केलं आहे. अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना दोन मुली आहेत.

कस्तुरी व ईशानी अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. कलाकारांची मुलं कला क्षेत्रातच करिअर करतात अस म्हटलं जात. पण अलका कुबल यांच्या मुलींनी वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

अलका कुबल
file photo

अलका कुबल यांची मोठी मुलगी इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळाले आहे. ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. ईशानीने २०१५ मध्येच अमेरिकेत अधिकृत लायसन्स मिळवले होते. पण इशानीला भारतात यायचं होते म्हणून इथे येऊन तिने अनेक परीक्षा दिल्या आहेत. तिने भारतातही लायसन्स मिळवले आहे.

अलका यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करत आहे तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचे आहे. तिचे अजुन शिक्षण सुरु आहे.

इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यापूर्वी या दोघांचा रोका समारंभ झाला आहे. निशांत मुळचा दिल्लीचा आहे. तो मियामीमध्येच स्थायिक आहे.

हे ही वाचलत का :

Back to top button