माझ्या नवऱ्याची बायको : रसिका सुनील हिच्या फोटोंनी सोशल मीडियावर राडा | पुढारी

माझ्या नवऱ्याची बायको : रसिका सुनील हिच्या फोटोंनी सोशल मीडियावर राडा

पुढारी ऑनलाईन : माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया अर्थातचं रसिका सुनील हिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर राडा केलाय. रसिका सुनिलने व्हाईट कलरच्या शर्टमधील ड्रेस सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. त्यामुळे तिच्या फोटोंवर चहत्यांकडून कमेट्सचा वर्षाव होत आहे.

रसिका सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आगामी प्रोजक्ट्सची माहिती ती चाहत्यांना शेअर करत असते. सोशल मीडियावरही ती खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असते.

अधिक वाचा –

रसिका सातत्याने आपले फोटोज शेअर करत असते. आता तिने स्वत: च केलेल्या मेकअपचे हॉट फोटो शेअर केले आहेत. व्हाईट कलरच्या शर्टमध्ये ओपन हेअर स्टाईलमध्ये तिने हे फोटो चाहत्यांसाठी अपलोड केले आहेत.

अधिक वाचा –

बॉयफ्रेंडसोबत नवे फोटोशूट

रसिकाने इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हे दोघेही स्माईल करताना दिसत आहेत. दोघांची जोडीही अप्रतिम दिसत आहे.

अधिक वाचा –

यात त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. आदित्यने काळ्या रंगाचा शर्ट, त्याच रंगाची पँट घातली आहे. त्यावर ग्रे रंगाचा टाय घातली आहे.

रसिकाने ग्रे रंगाचा कोट घातला असून त्यासोबत काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. रसिकाने हा फोटो शेअर करताच इन्स्टाग्रामवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसला आहे.

नव्या फोटोशूटमधील काही निवडक फोटो रसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रसिकाने काही महिन्यांपूर्वी नात्याचा केला खुलासा

होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे. असे म्हणत रसिकाने तिच्या नात्याचा खुलासा केला होता.

कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस, असं म्हणत रसिकाने काही महिन्यांपूर्वी आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले होते.

सध्या दोघेही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत आहेत.

मालिका सोडून विदेशात

दोन वर्षांपूर्वी रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. त्या ठिकाणी तिची आदित्यशी ओळख झाली होती. या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे.

हेदेखील वाचलंत का-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

Back to top button