सलमान खान : मैने प्यार किया फेम 'प्रेम' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

सलमान खान : मैने प्यार किया फेम 'प्रेम' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई ; पुढारी ऑनलाइन :  सलमान खान याने मैंने प्यार किया या चित्रपटात साकारलेली प्रेमची भुमिका अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. आता सलमान खान पुन्हा एकदा प्रेमच्या बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक अनिस बज्मी सलमान खानला घेऊन एक कॉमेडी चित्रपट तयार करत आहेत. यात सलमान खान प्रेमची भुमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे शुटिंग २०२२ मध्ये सुरु होणार आहे. सलमान खान “दबंगखान”, “टायगर खान”, भाईजान”,”सलमान भाई’ अशा बऱ्याच नावांनी ओळखला जातो. पण त्याचे प्रेम नाव कायम चर्चेत राहिले आहे.

सुरज बडजात्यांनी सलमानचे प्रेम नावेने केले बारसे 

सलमान खानने आपल्या अभिनयाची सुरुवात १९८८ मध्ये सहायक अभिनेता म्हणुन ‘बिवी हो तो ऐसि’या चित्रपतटातुन केली होती.  आतापर्यंत सलमान खानने तब्बल १५ चित्रपटांमध्ये प्रेम भुमिका केली आहे. त्याने पहिल्यांदा त्याचा चित्रपट जो १९८९ साली प्रदर्शित झाला होता तो म्हणजे मैने प्यार किया या चित्रपटात प्रेम भुमिका साकारलेली होती.

या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या ( राजश्री प्रॉडक्शन ) यांनी केले होते. या चित्रपटामधील त्याच्या प्रेम नावाच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं त्यानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये राजश्री प्रॉडक्शनने त्यांच्या चित्रपटांमध्ये त्याला प्रेम हे नाव दिले. मैंने प्यार कियासाठी चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला होता.

हे ही वाचा :

बिग बॉस ओटीटी: उर्फी जावेदने केला होता दावा, ‘शोमध्ये ऑनकॅमेरा सेक्स झालाय!’

लीसा हेडनचे बाळाला ब्रेस्टफिडींग करतानाचे फोटो व्हायरल

कंगणा राणावत, “मोदी नसते, तर भारताचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी…”

देवमाणूस! डॉक्टरचा खरा चेहरा काही सर्वांसमोर आला नाही

तब्बल १५ चित्रपटांमध्ये प्रेम

त्यानंतर त्याने ‘अंदाज अपना अपना’, ‘रेड्डी’, ‘नो एन्ट्री’, ‘पार्टनर’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘हम साथ साथ है’, ‘दीवाना मस्ताना’, ‘म आपके हैं कौन..!’, ‘जुडवा’, ‘कहीं प्यार ना हो जाए’, ‘चल मेरे भाई’, ‘मॅरिगोल्ड’ अशा तब्बल १५ चित्रपटांमध्ये त्याने प्रेम भुमिका साखारली आहे. सध्या सलमान खान टायगर-३ या चित्रपटाच्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे.

हे पाहिल का ?

प्रियांका चोप्रा आणि कोल्हापुरी स्ट्रॉंग वुमन

Back to top button