तेजश्री प्रधानचं कमबॅक? पुन्हा सुंदर लुकने वेधलं लक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : अगंबाई सासुबाई या मालिकेनंतर तेजश्री प्रधान पुन्हा कधी दिसणार, अशी चाहत्यांची मागणी होती. दरम्यान, तेजश्री प्रधान हिने तिच्या हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खरंतरं, तिचा हा लुक एकदम वेगळा होता.

तेजश्री प्रधान

अधिक वाचा –

आता पुन्हा तेजश्रीने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या लुकमध्ये ती नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसतेय. विशेष म्हणजे ती कमबॅक करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

तेजश्री प्रधान

अधिक वाचा –

मीडिया रिपोर्टनुसार, तेजश्री लवकरच एका नवीन मालिकेतून भेटीला येत आहे. या मालिकेचे नाव काय आहे. कोणकोणते कलाकार या मालिकेत असणार. कुठल्या चॅनेलवर येणार, या सर्व गोष्टी अद्याप गुलदस्त्यात आहेत.

तेजश्रीने स्वतःची एक प्रॉडक्‍शन कंपनी सुरू केली आहे. या निर्मितीतून ती लवकरच एक नवीन प्रोजेक्ट आणणार असल्याची माहिती आहे.

तेजश्री प्रधान

अधिक वाचा –

तेजश्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलंय, Reva’ will be meeting you all along with “Rajiv” in our first ever digital web series premiering on our YouTube channel ‘Story Vines’ so, subscribe the channel now (link in bio) to witness her journey in #LoveRush @tekdreamsproduction.

ती या वेबसीरीजमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तेजश्रीच्या प्रत्येक मालिकेतील अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली आहे. जान्हवी आणि शुभ्रा हे तिचे दोन्ही पात्र प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

तेजश्री प्रधान

तेजश्री नव्या लूकमध्ये 

तेजश्री होणार सून मी ह्या घरची आणि अगंबाई सासुबाई या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण तयार केली.

तेजश्री वेगळ्या भूमिकेतून पुन्हा एकदा भेटीला यावे असे आणि मागणी सुद्धा केली होती. अगंबाई सासुबाई ही मालिका संपू नये अशी अनेकांची इच्छा होती. पण, ही मालिका संपली आणि नवी मालिका अगंबाई सुनबाई आली. या मालिकेत नवी शुभ्रा पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी ती वेगळ्या लूकमध्ये दिसली होती. तिचे काही फोटोज व्हायरल झाले होते. पण, ही नक्की तेजश्रीचं आहे का, हे ओळखणं कठीण झालं होतं.

आता पुन्हा तिने काही नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्गही आहे. त्यामुळे तेजश्रीच्या कमबॅकची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

तेजश्री प्रधान

हेदेखील वाचलंत का? –

तेजश्री प्रधान
Exit mobile version