Sanya Malhotra : "... तर, तुमच्याकडे सांगण्यासारखी स्टोरी ही हवी" | पुढारी

Sanya Malhotra : "... तर, तुमच्याकडे सांगण्यासारखी स्टोरी ही हवी"

मुंबई पु़ढारी आनलाईन : टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी व्हायचे असेल तर फक्त टॅलेंट असून, चालत नाही तर तुमच्याकडे सांगण्यासारखी ‘स्टोरी’ ही असावी लागते, असे म्हंटले जाते. असाच काहीसा अनुभव सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) शेअर केला आहे.

तिला जायच होत रिअ‍ॅलिटी शोमध्ये, पण…

‘दंगल’ या चरित्रात्मक क्रीडा चित्रपटात बबिता कुमारीच्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अभिनेत्री सान्या मल्होत्राला (Sanya Malhotra) जायच होत रिअ‍ॅलिटी शोमध्ये आणि आपलं टॅलेंट सिध्द करायचं हाेत.

‘मला डान्स रिअ‍ॅलिटी शोेमध्ये सहभागी व्हायचे होते; पण अशी काही सांगण्यासारखी ‘बॅकस्टोरी’ नसल्याने मी रिजेक्ट झाले. माझ्यासोबत ऑडिशन देणाऱ्या अनेक मित्रांनी अशा कपोलकल्पित कहाण्या रचून प्रवेश मिळवला.

“सांग त्यांना आम्ही तुला खूप मारहाण करत होतो…

मी आई-वडिलांसोबत विचार करत होते की मी काय सांगावे रिअ‍ॅलिटी शोेमध्ये? तेव्हा पप्पा म्हणाले की, “सांग त्यांना आम्ही तुला खूप मारहाण करत होतो, डान्स करू देत नव्हतो, तू रस्त्यावर उभे राहून प्रॅक्टिस केलीस वगैरे.” पण ते मलाच पटले नाही, त्यामुळे तसे काही सांगितले नाही.

पहा व्हिडीओ : उमेश कामत आणि प्रिया बापटशी गप्पा

Back to top button