सोनम कपूर प्रेग्नेंट? व्हिडिओ व्हायरल

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूरने बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत सात फेरे घेतले. या विवाह सोहळ्यात रियाची बहीण सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत पोहोचली. यावेळी सोनम कपूर सोहळ्यात आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली. परंतु, यातील फोटोंवरून सोनम प्रेग्नेंट आहे काय? असा सवाल उपस्थित केला गेला आहे.

कपूर कुटुंबियांनी रिया आणि तिची बॉयफ्रेंड करण बूलानी यांचा मोजक्याच पाहूण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. या सोहळ्यात रिया आणि करण दोघेही आनंदीत असून खूपच सुंदर दिसत होते.

बहीण रियाच्या लग्नात सोनम कपूर खूप सुंदर दिसत होती. सोनमने या खास प्रसंगी पेस्टल ग्रीन रंगाचा अनारकली सूट घातला होता. सोशल मीडियावर सोनम कपूरचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच, एकीकडे चाहत्यांनी तिचे कौतुक करायला सुरुवात केली, तर दुसरीकडे तिच्या प्रेंग्नशीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. खरंच सोनम करून गुडन्यूज देणार का? याकडे चाहत्याचे लक्ष लागून राहिले आहे.

चाहत्यांनी या फोटोंवर वेगवेगळ्या कॉमेंन्टस करत कपूर कुटूंबियाना लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या विवाहसोहळ्यास मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळीसोबत बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, बोनी कपूर, मसाबा गुप्ता, अंशुला कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, संदीप मारवाह, संजय कपूर, महेप कपूर आणि जहान कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रिया आणि करणच्या लग्नानंतर अनिल कपूर स्वत: मीडियासमोर आले. यानंतर पहिल्यांदा अनिल यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले आणि मुलगी आमि जावईच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी अनिल कपूर निळ्या रंगाच्या कुर्तात नेहमीसारखा डॅशिंग दिसले.

कोण आहे करण बूलानी ?

करण बूलानी हा एक दिग्दर्शक आहे. त्यांने ‘आयशा’ आणि ‘वेकअप सिड’ सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. यासोबतच त्याने अनेक चित्रपट आणि शोमध्ये दिग्दर्शन, निर्मिती आणि डबिंगचे कामही केले आहे. रिया आणि करणची ओळख २०१० मध्ये ‘आयशा’ चित्रपटात एकत्र काम करताना झाली हाेती.

हेही वाचलं का? 

(video : varindertchawla instagram वरून साभार)

 

Exit mobile version