एक स्त्री राहणार दोन प्रियकरांसोबत? 'सोप्पं नसतं काही' | पुढारी
Trending

एक स्त्री राहणार दोन प्रियकरांसोबत? 'सोप्पं नसतं काही'

रिंकी खाडे

एक स्त्री राहणार दोन पुरूषांसोबत? ‘सोप्पं नसतं काही’! पुर्वीपासून पाश्चिमात्य देशांमध्ये एक स्त्री दोन पुरूषांसोबत किंवा दोन पुरूष एका स्त्री सोबत राहतात हा प्रकार प्रचलित आहे. भारतामध्येही हा प्रकार नवीन आहे असं नाही. कारण महाभारतामधील द्रोपदीलाही पाच नवरे होते. परंतु आजच्या काळात असा काही प्रकार भारतात घडेल हे कोणालाही पचनी न पडण्यासारखं आहे. एक स्त्री दोन पुरूषांसोबत राहते आणि तिचं दोघांवरही समान प्रेम आहे अशी आगळीवेगळी कहाणी घेवून प्लॅनेट मराठी ओटीटी ‘सोप्पं नसतं काही’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेवून आले आहे.

अधिक वाचा-

मयुरेश जोशी दिग्दर्शित या वेब सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेता अभिजित खांडकेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

अधिक वाचा-

मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजित हे दोन्ही पुरूष असतात आणि ती दोघांसोबत एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त करते. मग हा नात्याचा गुंता हे तिघं कसे सोडवणार? यावर आधारित ही वेब सीरिज आहे. ट्रेलर रिलिज होताचं काही क्षणातचं ही वेब सीरिज ट्रोल होतं आहे. “मराठी सिनेसृष्टीत कन्टेन्ट राहिला नाही म्हणून हे असं काही दाखवू नका “, “भारतीय संस्कृतीचं भान राहू द्या “असं चक्क नेटकऱ्यांनी कलाकारांना बजावलं आहे.

अधिक वाचा-

या निगेटिव्ह कमेंटबद्दल पुढारीशी बोलताना मृण्मयी म्हणते ” मी कलाकार म्हणून यामध्ये काम केलेलं आहे. कोणाला ते त्यांच्या विचारांनी चुकीचं घ्यायचं असेल तर मी काही करू शकतं नाही.” अनुजा एक मुक्त विचारांची मुलगी आहे आणि तिचं खरोखर दोघांवर प्रेम आहे. प्रेम ही एक व्यक्त होणारी भावना आहे आणि तेचं अनुजा करतेय असंही पुढे मृण्मयी म्हणाली.

 

प्रेक्षकवर्गांनी पब्लिक फिगर आणि पब्लिक प्रॉपर्टी यातला फरक समजायला हवा, आमचे नातेवाईक, आई-बाबा सोशल मीडियावर आहेत. त्यांना याचा फरक पडतो आणि परिणामी आम्हाला त्रास होतो असं मतं शशांकने पुढारीशी बोलताना व्यक्त केलं.

mrunmayee deshpande ess-146-1024x1024
मृण्मयी देशपांडे

सध्या सोशल मीडियावर व्हायरल मिम्सच्या प्रकाराबद्दल बोलताना अभिजीत म्हणतो “मिम्स जोपर्यंत विनोद असतात तोपर्यंत ठीक असतं परंतु जर कोणी अश्लिल शब्द वापरून पर्सनल अटॅक करत असेल तर ते फार चुकीचं आहे.”

‘सोप्पं नसतं काही’ या वेब सीरिजच्या माध्यमातून एक वेगळा विषय मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा गंभीर विषय अतिशय साध्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून केला गेला आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप सारखा प्रचलित प्रकार आजवरही भारतात मान्य केला जात नाही. एक स्त्री आणि एक पुरूष हीच नात्याची व्याख्या. नवलं म्हणजे भारताच्या अनेक भागात पहिली बायको मुलाला जन्म देण्यास समर्थ नसेल किंवा पहिल्या बायकोमधून मन भरलं असेल तर पुरूष दुसरं लग्न करून दोन्ही स्त्रियांसोबत राहतो. परंतु एक स्त्री दोन पुरूषांसोबत राहते असं काहीसं आजवर पाहायला किंवा ऐकायला मिळालेलं नाही म्हणून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या मनात घर करते का? याकडे आता सगळ्यांच लक्ष आहे.

हेदेखील वाचलंत का? –

 

Back to top button