देवमाणूस! डॉक्टरचा खरा चेहरा काही सर्वांसमोर आला नाही | पुढारी

देवमाणूस! डॉक्टरचा खरा चेहरा काही सर्वांसमोर आला नाही

मुंबई; पुढारी ऑनलाईन : झी मराठीवरील क्राईम थिल्लर बहुचर्चित देवमाणूस मालिकेचा शेवटचा दोन तासांचा एपिसोड काल रविवारी दाखवण्यात आला. देवमाणूस मालिकेतील या शेवटच्या एपिसोड विषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. पण या मालिकेच्या शेवटाने प्रेक्षक गोंधळात पडले.

शेवटच्या एपिसोडमध्ये डॉक्टरच्या डोक्यात चंदा दगड घालते. तर चंदाला डिंपल मारते. पण शेवटी डॉक्टरचा मृत्यू काही होत नाही. आणि त्याला शिक्षा देखील झालेली नाही.

देवमाणूस मालिकेचे ३०० एपिसोड दाखवण्यात आले. पण पैसे आणि दागिन्यांसाठी एकामागून एक खून करणाऱ्या देवमाणूस डॉक्टराला काही शिक्षा झालेली दाखविण्यात आलेली नाही. यामुळे प्रेक्षक गोंधळात पडल्याचे दिसून आले. तशा प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

देवमाणूस ही लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. पण, त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. देवमाणूस मालिकेत बोगस डॉक्टरचे भयानक कारनामे दाखवण्यात आले आहेत.

देवमाणूसमध्ये चतुराईने डॉक्टर त्याच्यावर लावलेले आरोप खोटे ठरवतो. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडतो. देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहे, हे पटवून देतो. पण ठोस पुराव्यांअभावी कोर्ट देखील अजितकुमारची सुटका करते.

अभिनेता किरण गायकवाड याची या मालिकेत मुख्य भूमिका आहे. यातील सरू आज्जी, डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत. त्यांनी दमदार अभिनय केला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या ? | Actress Rukmini sutar Exclusive

Back to top button