पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बॉयफ्रेंड नेमका आहे तरी कोण ? (Sonakshi I Love You) याची चर्चा बाॅलीवूडसह तिच्या फॅन्समध्ये नेहमी सुरु असते. मध्यंतरी सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सलमान खान यांच्यात अफेअर असल्याचा चर्चा सुरू होत्या. यापुढे जाऊन सोनाक्षीच्या साखरपुड्याच्या चर्चाही रंगल्या होत्या; पण आज सोनाक्षी सिन्हाचा बॉयफ्रेंड कोण याची माहिती समाेर आली आहे.
झहीर इक्बाल यांनी सोनाक्षीसोबत एक व्हिडीओ शेअर करत आय लव्ह यू, असे म्हटले आहे. या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेकांनी प्रतिक्रिया देत हार्टच्या इमोजी दिल्या आहेत. सोनाक्षी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला तू ठार मारलं नाहीस, याबद्दल आभारी आहे. आय लव्ह यू. भरपूर विमानप्रवास, खाद्यपदार्थ आणि बऱ्याच शुभेच्छा, असे झहिरने म्हटलं आहे. झहीरने सोनाक्षीला उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हा मेजेस शेअर केला आहे. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा अनेकवेळा एकत्र दिसले आहेत; पण दोघांनी त्यांच्यातील रिलेशन जाहीररीत्या मान्य केले नव्हते. झहीर हा सोनाक्षीसोबत डबल एक्सएल या सिनेमात काम करत आहे.
झहीर याने यापूर्वी नोटबूक या सिनेमात काम केले आहे. त्याचे वडील त्याचे वडील इक्बाल आणि सलमान खान चांगले मित्र आहेत. नोटबूक या चित्रपटाची निर्मिती सलमान खाननेच केली होती. तर झहीरचा भाऊ सनम हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टायलिस्ट आहे. झहिर आणि सलमानची बहीण अर्पिता एकाच शाळेत शिकले आहेत. झहिरचे नाव यापूर्वी दिक्षा सेठ, सना सईद यांच्याशी जोडले होते.
हेही वाचलंत का ?