रियाच्या वडिलांना घाम फुटला; तब्बल १० तास चौकशी  | पुढारी

रियाच्या वडिलांना घाम फुटला; तब्बल १० तास चौकशी 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सीबीआयने अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी (बुधवार दि.२) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वडिलांची चौकशी केली. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रियाच्या वडिलांची जवळपास १० तास चौकशी झाली.

पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती सकाळी जवळपास साडे दहा वाजता एका कारमधून कालीना येथील DRDO गेस्ट हाऊस येथे पोहोचले. येथे सीबीआयची टीम उपस्थित होती. त्यांच्या कारसोबत पोलिसांची एक गाडीदेखील होती. चौकशीनंतर ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान तेथून बाहेर पडले.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतचे व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, स्वयंपाकी नीरज सिंह, घरगुती सहाय्यक केशव आणि वित्तीय व्यवस्थापक श्रुती मोदी हेदेखील चौकशीसाठी सकाळी गेस्ट हाऊस पोहोचले. हे सर्वजण रिया चक्रवर्तीनंतर गेस्ट हाऊसमधून बाहेर पडले.

रियाची ३५ तास चौकशी 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि आईला बुधवार दि. २ रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. याआधी मंगळवार दि. १ रोजी सीबीआयच्या टीमने रियाचे वडील आणि आईची ८ तासांहून अधिक चौकशी केली होती. रियाची मागील शुक्रवार ते सोमवारपर्यंत चार दिवसांत जवळपास ३५ तास चौकशी केली होती. 

Back to top button