कंगनाला संजय राऊतांकडून चोख प्रत्युत्तर! | पुढारी

कंगनाला संजय राऊतांकडून चोख प्रत्युत्तर!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची क्विन कंगना राणावत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप करून चांगलीच चर्चेत आली आहे. रणवीर सिंह, रणबीर कपूर यासारखे सेलिब्रिटीं ड्रग्ज घेतात. त्यांची रक्त चाचणी करण्यात यावी, असे कंगनाने ट्विट करत पीएमओंना टॅग केले होते. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाच्या ड्रग्ज मुद्द्यावर प्रत्युत्तर दिलं. ट्विटरवर खेळण्यापेक्षा त्यांनी (कंगना राणावत) सरकारकडे जाऊन ड्रग्जचा मुद्दा मांडावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 

वाचा – कंगना राणावतचे नाव घेऊन चौघांना रक्ताची चाचणी करण्यासाठी ओपन चॅलेंज!

ट्विटरवर कंगनाने बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे घेतली आणि अशी सूचना केली की त्यांनी आपली रक्त चाचणी घ्यावी जेणेकरुन ते ड्रग्ज घेत नाही हे लोकांसमोर येईल आणि आरोपांचा पदार्फाश होईल. कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, ‘मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांना  त्यांच्या रक्ताचे नमुने देण्याची विनंती करत आहे. ते कोकेनची नशा करतात असा आरोप आहे. त्यांनी या अफवांचा पर्दाफाश करावा, असं मला वाटतं. असे करून ते कोट्यवधी लोकांना प्रेरणा देऊ शकतात.’

कंगनाचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले. आज संजय राऊत यांना कंगनाच्या ड्रग्ज मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, ट्विटरवर खेळण्यापेक्षा त्यांनी हे सरकार समोर मांडावं. ड्रग्जबाबत पुरावे असतील त्यांनी (कंगना राणावत) पोलिसांकडे जावं. 

Back to top button