कंगना म्हणते, मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलयं! | पुढारी

कंगना म्हणते, मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलयं!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपणास धमकी दिल्याचा आरोप केला. मुंबईत परत न येण्याची धमकी राऊत यांनी दिल्याचे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, ‘शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आहे आणि म्हटले आहे की, मुंबईला परतून येऊ नकोस. मुंबईतील गल्ल्यांमधून स्वातंत्र्याच्या घोषणांनंतर आता उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटू लागली आहे?’

ट्विटसोबत कंगनाने एका वृत्ताची लिंकदेखील शेअर केली आहे. जर आपण मुंबई पोलिसांना घाबरता, तर आपण मुंबई परतून न येण्याची आम्ही विनंती करतो, असे संजय राऊत यांनी कंगनाला म्हटल्याचे तिने यामध्ये स्पष्ट केले आहे. 

वाचा – कंगना राणावतचे नाव घेऊन चौघांना रक्ताची चाचणी करण्यासाठी ओपन चॅलेंज!

राऊत यांनी कंगनाच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी ‘सामना’तून कंगनावर निशाणा साधत तिने मुंबईत परतून न येण्याविषयी म्हटले होते. कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत हिमाचल प्रदेश पोलिस वा केंद्र सरकारकडून सुरक्षा घ्यावी, असे म्हटले होते. त्यावेळी राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला होता. 

‘मुंबई पोलिसांची भीती वाटते’

कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा खुलासा केल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु, कंगनाने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. ३० ऑगस्टला केलेल्या आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिलं होतं, ‘आपण चिंता केली, यासाठी धन्यवाद सर, वास्तवात मला मूवी माफियाच्या गुंडांपेक्षा अधिक मुंबई पोलिसांची भीती वाटते. तसेच आता मला हिमाचल प्रदेश सरकार वा सरळ केंद्र सरकारकडे सुरक्षा मागावी लागेल. मुंबई पोलिसांची सुरक्षा अजिबात नाही.’

महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे-नीलेश राणे 

दुसरीकडे, भाजप नेते नीलेश राणे यांनी ट्विट करत लिहिले आहे, ‘दोन किंवा तीन अधिकारी दबावात आले, त्याचा अर्थ असा नाही की, संपूर्ण पेलिस विभाग दोषी आहे. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. मुंबई पोलिसांबद्दल बोलणारी राणावत कोण आहे?….आम्ही आमच्या पोलिसांसाठी कुणाचाही अपमान सहन करणार नाही.’

बॉलिवूडमधील काही सेलेब्सची रक्त चाचणी करण्याची मागणी करत कंगनाने सेलिब्रिटींवर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला होता. यामध्ये रणवीर कपूर, रणवीर सिंह यासारख्या सेलेब्सची नाहे तिने समोर आणली होती. 

वाचा – कंगनाला संजय राऊतांकडून चोख प्रत्युत्तर!

Back to top button