मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाला रितेश देशमुखचा तीनच शब्दात सणसणीत टोला! | पुढारी

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाला रितेश देशमुखचा तीनच शब्दात सणसणीत टोला!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे. कंगणाने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मुंबईत परत न येण्याची धमकी राऊत यांनी दिल्याचे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, ‘शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आहे आणि म्हटले आहे की, मुंबईला परतून येऊ नकोस. मुंबईतील गल्ल्यांमधून स्वातंत्र्याच्या घोषणांनंतर आता उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटू लागली आहे?’

अधिक वाचा : कंगना म्हणते, मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलयं!

या ट्विटनंतर अभिनेता रितेश देशमुखने तीनच शब्दात मुंबई हिंदुस्तान है असे ट्विट करत कंगणाच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.  शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी ‘सामना’तून कंगनावर निशाणा साधत तिने मुंबईत परतून न येण्याविषयी म्हटले होते. कंगनाने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत हिमाचल प्रदेश पोलिस वा केंद्र सरकारकडून सुरक्षा घ्यावी, असे म्हटले होते. त्यावेळी राऊत यांनी कंगनावर निशाणा साधला होता. 

अधिक वाचा : कंगनाला संजय राऊतांकडून चोख प्रत्युत्तर!

‘मुंबई पोलिसांची भीती वाटते’

कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा खुलासा केल्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु, कंगनाने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. ३० ऑगस्टला केलेल्या आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिलं होतं, ‘आपण चिंता केली, यासाठी धन्यवाद सर, वास्तवात मला मूवी माफियाच्या गुंडांपेक्षा अधिक मुंबई पोलिसांची भीती वाटते. तसेच आता मला हिमाचल प्रदेश सरकार वा सरळ केंद्र सरकारकडे सुरक्षा मागावी लागेल. मुंबई पोलिसांची सुरक्षा अजिबात नाही.’

अधिक वाचा : कंगना राणावतचे नाव घेऊन चौघांना रक्ताची चाचणी करण्यासाठी ओपन चॅलेंज!

Back to top button