सुशांतचा मित्र संदीप सिंहने अखेर सोडलं मौन! | पुढारी

सुशांतचा मित्र संदीप सिंहने अखेर सोडलं मौन!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतचा जवळचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंहचाही समावेश आहे. संदीप सिंहवर होत असलेल्या आरोपानंतर आता त्याने मौन सोडले असून आपले मत सोशल मीडियाच्या माध्य़मातून मांडले. संदीपने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना तो काय म्हणाला पाहा.   

संदीप सिंह म्हणाला की, ‘मला मैत्रीचे सर्टिफिकेट द्यावं लागत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला आक्षेपार्ह शब्द बोलले जात आहेत. मी आरोपी आहे का? जे आरोप करत आहेत, ते सुशांतच्या अंत्यसंस्काराला का आले नाहीत. रियाने स्वत: खुलासा केला आहे की, ती मला ओळखत नाही. सीबीआयच्या टीमने मला यासाठी बोलावलं होतं की, १४ आणि १५ जूनला काय-काय झालं होतं, याची त्यांना माहिती हवी होती. जे सत्य होतं, त्या सर्व गोष्टी मी सांगितल्या. सीबीआयकडून तपास व्हावा, असे सर्व लोकांना वाटत होतं. परंतु, आता लोकच ठरवतील की आरोपी कोण आहे? आपल्याला थोडा धीर धरायला हवा.’ 

वाचा – रियाचा भाऊ, सुशांतचा मॅनेजर अटकेत!

मीडियामध्ये येत असलेल्या वृत्तांनंतर संदीप सिंहने इन्स्टाग्रामवर रुग्णवाहिका चालकाशी आणि सुशांतची बहिण मीतू सिंहशी झालेल्या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटदेखील शेअर केले आहेत.

वाचा – सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया अटकेसाठी तयार

याशिवाय इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये संदीप म्हणतो की, ‘माफ कर भावा, माझ्या मौनामुळे २० वर्षांपासून असलेली प्रतिमा आणि माझे कुटूंब तुकड्यांमध्ये विखुरलं गेलं. मला माहिती नव्हतं की, आजच्या काळात मैत्रीसाठी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. आज मी आपले वैयक्तिक चॅट सार्वजनिक करत आहे. कारण, हा शेवटचा उपाय आहे, जो आपले नाते सिध्द करू शकतो.’

वाचा- सुशांत प्रकरणात आणखी एक अटकेत!

संदीपने सुशांतसोबत झालेल्या चर्चेचे जे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत, ते नोव्हेंबर २०१६ आणि जून २०१८ चे आहेत. यामध्ये ९ नोव्हेंबर २०१६ च्या चॅटमध्ये सुशांतने संदीपला म्हटले आहे की, ‘माझ्याकडे असे मित्र नाहीत, जसे असायला हवेत. परंतु, असेही नाही की, माझ्याकडे केवळ शेट्टी आहे. तुझंदेखील नेहमी स्वागत आहे भावा.’

Back to top button