काय करायचं ते करा म्हणत चॅलेंज देणारी कंगणा हिमाचल प्रदेशच्या सुरक्षेत मुंबईत येणार! | पुढारी

काय करायचं ते करा म्हणत चॅलेंज देणारी कंगणा हिमाचल प्रदेशच्या सुरक्षेत मुंबईत येणार!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी अभिनेत्री कंगणा राणावतला मुंबईत ९ सप्टेंबरला येताना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. कंगणा मी येतोय ९ सप्टेंबरला मुंबईत तुम्हाला काय करायचं ते करा अस जाहीर आव्हान शिवसेनेला दिले आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. 

अधिक वाचा : सुशांतचा मित्र संदीप सिंहने अखेर सोडलं मौन!

गेल्या अनेक दिवसांपासून कंगणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील संघर्ष पेटला आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, कंगणा हिमाचलची कन्या आहे आणि सेलिब्रेटीही आहे. त्यामुळे तिला सुरक्षा देणं आमची जबाबदारी आहे. माजी पोलिस महासंचालकांशी या संदर्भात बोलणं झालं असून त्यांना निर्णय घेण्यास सांगितलं आहे. शिमलामध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी कंगणाच्या सुरक्षेवर भाष्य केलं. 

अधिक वाचा : स्पोर्ट्स ब्रा घालून वर्कआऊट करणाऱ्या अभिनेत्रीशी गैरवर्तन (video)

ठाकूर  यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कंगणाचा ९ सप्टेंबरला मुंबईला नियोजित दौरा आहे. गरज पडल्यास राज्यात तसेच तसेच राज्याबाहेर तिला सुरक्षा देण्याविषयी आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. कंगणाची बहिण रंगोली आणि तिच्या वडिलांनी शनिवारी हिमाचल पोलिसांची भेट घेऊन सुरक्षा देण्याची विनंती केली. दरम्यान,  मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगणाच्या वक्तव्यांवर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. संजय राऊत यांनी दिलेल्या  आव्हानावरही त्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. 

अधिक वाचा : कंगणाचे संजय राऊतांना पुन्हा ओपन चॅलेंज (video)

Back to top button