दिवाळीत अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब'चा धमाका होणार?  | पुढारी

दिवाळीत अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब'चा धमाका होणार? 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘खिलाडी’ अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ ईदच्या औचित्याने रिलीज होणार होता. कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट टळली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ची रिलीज डेट समोर आली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ यावर्षी दिवाळीला रिलीज होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. 

वाचा – काय करायचं ते करा म्हणत चॅलेंज देणारी कंगणा हिमाचल प्रदेशच्या सुरक्षेत मुंबईत येणार!

‘लक्ष्मी बॉम्ब’ दाक्षिणात्य चित्रपट ‘कंचना’चा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार ट्रांसजेडरची भूमिका साकारत आहे. राघव लॉरेंस दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अक्षयसोबत कियारा आडवाणीदेखील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘लक्ष्मी बॉम्ब’चा प्रीमियर दिवाळी २०२० मध्ये ऑनलाईन होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट १३ नोव्हेंबर, २०२०२ निश्चित करण्यात आली आहे. अक्षय कुमार ‘बेल बॉटम’च्या शूटिंगनंतर लंडनहून परतल्यानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ची टीम शिल्लक असलेले चित्रपटाचे काम पूर्ण करेल. 

वाचा – सुशांतचा मित्र संदीप सिंहने अखेर सोडलं मौन!

‘लक्ष्मी बॉम्ब’ रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाह. ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीत रिलीज झाल्य़ास अक्षय आणि वरुण धवनची टक्कर निश्चित आहे. जॅकी भगनानी प्रोडक्शन हाऊस वरुण धवन आणि सारा अली खान स्टारर ‘कुली नंबर १’ ला दिवाळीत रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.

Back to top button