राधिका आपटेने जेव्हा कास्टिंग काउचविषयी केला होता मोठा खुलासा | पुढारी

राधिका आपटेने जेव्हा कास्टिंग काउचविषयी केला होता मोठा खुलासा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री राधिका आपटे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातच नव्हे तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकली आहे. राधिका आपटे बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने चित्रपटांमध्ये न्यूड आणि बोल्ड सीन दिले आहेत. बदलापूर चित्रपटाच्या दरम्यान न्यूड व्हिडिओमुळेही ती चर्चेत राहिली होती.

‘द वेडिंग गेस्ट’ या चित्रपटातील एक बोल्ड सीन लिक झाल्यानंतरही ती चर्चेत राहिली होती. चाकोरीबाहेरचे अनेक चित्रपट तिने केले आहेत. मात्र, तिच्या अभिनयापेक्षाही तिच्या बोल्ड सीन्सचीच अधिक चर्चा केली जात असते. स्वतः राधिकालाही या गोष्टीचे वैषम्य वाटते. मीटूच्या वादळात राधिकाने फिल्म इंटस्ट्रीतील कास्टींग काउचबद्दलचे धक्कादायक अनुभवदेखील सर्वांसमोर आणले.

Upcoming Telugu actress wants to become Radhika Apte

राधिकाचा आज वाढदिवस. राधिकाचा जन्‍म ७ सप्‍टेंबर, १९८५ मध्‍ये तामिळनाडूच्‍या वेल्लोर शहरात  झाला. बालपण पुण्‍यात गेलं. राधिकाचे वडील डॉ. चारुदत्त आपटे तामिळनाडूमध्‍ये न्यूरोसर्जन होते. चित्रपट करण्‍यापूर्वी ती नाटकांत काम करत होती. २००५ मध्‍ये आलेला चित्रपट वाह! लाईफ हो तो ऐसी! यातून तिने बॉलिवूडमध्‍ये एंट्री केली. मराठी, हिंदी बरोबरच राधिकाने तमिळ, तेलुगू, मल्‍याळम, बंगाली चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिध्द केले आहे. 

तिने २०१३ मध्‍ये ब्रिटिश संगीतकार Benedict Taylor शी विवाह केला. 

Radhika (@radhikaofficial) • Instagram photos and videos | Radhika apte,  Photoshoot, Bollywood actress

राम गोपाल वर्माच्‍या ‘रक्‍त चरित्र’मधून राधिकाचं चित्रपटसृष्‍टीतलं करिअर फुललं. राधिकाने धोनी (तमिल / तेलुगू), तुकाराम, लय भारी (मराठी) या चित्रपटांत काम केलं. चित्रपट ‘बदलापुर’मधून राधिकाने पुन्‍हा दमदार आगमन केलं होतं. राधिकाने एका वर्षात ८ चित्रपट करून रेकॉर्ड केलं होतं. तिने ‘पार्च्ड’ या चित्रपटात न्‍यूड सीन दिल्‍यानंतर राधिकाची चांगलीच चर्चा रंगली होती. राधिकाने शॉर्ट फिल्‍म्‍स केल्‍या आहेत. परंतु, ‘पॅडमॅन’ आणि ‘मांझी’मुळे राधिकाला अभिनयाची चुणूक दाखवता आली.

नेटफ्लिक्सच्‍या वेब सीरीजमध्‍ये ‘सेक्रेड गेम्स’ दिसलेली राधिका आपटे आता घौउल या सस्‍पेन्‍स थ्रीलरमध्‍ये दिसली. याआधी राधिका रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत दिसली होती. नेटफ्लिक्सची सर्वांत लोकप्रिय सीरीज सेक्रेड गेम्स आणि घोउलमुळे राधिकाने यशाची उंची अधिक गाठली. सेक्रेड गेम्‍सचं पहिलं सीजन रिलीज झाल्‍यानंतर ही सीरीज वादात सापडली होती. 

5 Short Films Featuring Radhika Apte To Binge-Watch This Weekend | Social  Goat

राधिका आपटेने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ती मुंबईला आली होती, तेव्हा लोक तिला रात्री उशीरा भेटण्यास सांगायचे. पण, राधिका त्यास नकार द्यायची.

राधिकाने या कार्यक्रमात MeToo चा अनुभवदेखील शेअर केला होता.  राधिका म्हणाली होती की, “मी एक घटना सांगणार आहे, जी माझ्यासोबत नुकतीच घडली. आम्ही शूटिंग आटोपून परतत होतो आणि त्या वेळी माझी कंबर खूप दुखत होती. मी माझ्या रूममध्ये जात होते. तेव्हा माझ्यासोबत लिफ्टमध्ये आणखी एक अॅक्टर होता. तोही माझ्या चित्रपटाचाच भाग होता. परंतु माझी त्याच्याशी खास बातचीत होत नव्हती. त्याला जेव्हा कळले की, माझ्या पाठीत दुखत आहे तर तो म्हणाला की, मला सांग जर रात्री माझी गरज पडली, तर मी तुझ्या रूममध्ये येऊन मालिश करू शकतो.”

Radhika Apte Instagram – Latest News Information updated on August 09, 2019  | Articles & Updates on Radhika Apte Instagram | Photos & Videos | LatestLY  - Page 3

राधिका पुढे म्हणाली की, “ही चांगली गोष्ट आहे की, सेटवर खूप चांगले वातावरण होते. मी चित्रपट संबंधित टीमला सांगितले होते आणि त्यांनी त्या व्यक्तीसोबत एक मीटिंगही केली होती. मग मला कळले की, तो अभिनेता ज्या संस्‍कृतीमधून आला आहे, तेथे त्याच्यासाठी ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. त्याला जाणवलेही नाही की, त्याच्या बोलण्यामुळे मी किती चिंतेत होते. तथापि, यानंतर त्याने माझी माफीही मागितली.”

घोउल, ‘अंधाधुंन’, रात अकेली है, यासारखे चित्रपट करणाऱ्या राधिकाने सुपरस्टार रजनीकांतसोबतदेखील काम केले आहे. 


 

Back to top button