कंगनाला विमानतळावरून घरी नेण्यास करणी सेना देणार सुरक्षा  | पुढारी

कंगनाला विमानतळावरून घरी नेण्यास करणी सेना देणार सुरक्षा 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या वादात करणी सेनेने उडी घेतली आहे. कंगनाला Y दर्जाची सुरक्षा मिळाल्यानंतर करणी सेनेने तिला समर्थन दिले आहे. कंगना मुंबईत आल्यानंतर विमानतळावरून घरापर्यंत पूर्ण सुरक्षेसह नेण्यास करणी सेनेने तयारी दर्शवली आहे. 

वाचा – कंगना राणावत मुंबईत येताच तिला क्वारंटाईन करणार : महापौर

कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद थांबायचे नाव घेईना. कंगना राणावतच्या समर्थनार्थ आता करणी सेना उतरली आहे. कंगनाला सुरक्षा देण्यासाठी ९ सप्टेंबरला विमानतळावर करणी सेना उपस्थित राहील, असे वृत्त समोर आले आहे. 

वाचा – कंगणाच्या मदतीला थेट मोदी सरकार; दिली Y दर्जाची सुरक्षा!

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर तिच्यावर टिकेची झोड उडत आहे. या मुद्द्यावरून कंगना आणि  संजय राऊत यांच्यात वाक्‌युद्ध सुरु आहे. शिवाय तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आणि बॉलिवूडमधील काही मंडळींचे ड्रग्ज कनेक्शन या मुद्द्यावरून आपले मत मांडले होते. 

वाचा – काय करायचं ते करा म्हणत चॅलेंज देणारी कंगणा हिमाचल प्रदेशच्या सुरक्षेत मुंबईत येणार!

करणी सेनेचे जीवन सोलंकी म्हणाले, ‘कंगना राणावतचे समर्थन करण्यासाठी करणी सेना ९ सप्टेंबरला मुंबई विमानतळावर उपस्थित राहील. करणी सेनेचे सदस्य कंगनाला सुरक्षा देत विमानतळावरून तिच्या घरापर्यंत पोहोचवतील. 

वाचा – कंगणा विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल

दरम्यान, कंगना राणावतला Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तत्पूर्वी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी अभिनेत्री कंगना राणावतला मुंबईत ९ सप्टेंबरला येताना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी येतेय ९ सप्टेंबरला मुंबईत, तुम्हाला काय करायचं ते करा’ असं जाहीर आव्हान कंगनाने शिवसेनेला दिला आहे. 

 

Back to top button