निवृत्त पोलिस अधिकार्‍यांनी बजावली  कंगनाला नोटीस | पुढारी

निवृत्त पोलिस अधिकार्‍यांनी बजावली  कंगनाला नोटीस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने  राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर ट्विट करून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करून तिच्या विरोधात ५० कोटी रूपयांच्या मानहानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला  आहे. सेवा निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप लोणंदकर या एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दाखल केलेल्या फौजदारी आणि दिवाणी दाव्यावर न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्या समोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीसांच्या विरोधात कंगनाने सुरू केलेले ट्विट चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असला तरी मुंबई पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही टिप्पणी केली नाही. मात्र अभिनेत्री  कंगना राणावतने ट्विटच्या माध्यमातून  सुशांत सिंह प्रकरणात कंगनान बॉलिवूडमधील बडी नाव, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष, शिवसेनेचे संजय राऊत यासंर्वांविरोधात समाजमाध्यमांवरून जाहीर टिका केली. अशा प्रकारे टिका करण्याचा अधिकार कंगनाला दिला कोणी असा सवाल या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. कोरोना सारख्या महामारीशी मुकबला करताना पोलिस स्वत:च्या जीवाची बाजी लाऊन लढत आहेत. 

कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना आपले प्राणही गमवावे लागलेत. त्यामुळे सतत जनतेच्या सेवेसाठी झटणाऱ्या पोलिसांविरोधात बेताल वक्त करून जनमानसांतली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीच्या या बेताल वक्तव्या बद्दल तिला दोषी ठरवून नुकसान भरपाई म्हणून ५० कोटी रूपये पोलिस वेलफेअर फंडमध्ये जमा करावेत. अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

Back to top button