दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन  | पुढारी

दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन   

दाक्षिणात्य चित्रपटांचे अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दि. ८ रोजी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलुगू चित्रपटांचे कॉमेडी अभिनेते म्हणूनही जयप्रकाश रेड्डी ओळखले जात होते. तर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाचीही भूमिका साकारल्या. त्यांनी ब्रम्ह पुत्रुदू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 

जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानंतर अनेक कलाकारंनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऐंशीच्या दशकाच्या अखेरपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या होत्या. बालकृष्ण स्टारर समरसिम्हा रेड्डीतून त्यांना ओळख मिळाली.

जयप्रकाश रेड्डी यांना तेलुगू चित्रपटांमध्ये जेपी नावाने ओळखले जात होते. एक कॉमेडी अभिनेत्याबरोबरच त्यांनी जयम मनाडे रा आणि चेन्नेकसा रेड्डी यांसारख्या चित्रपटांमधून खलनायकाची भूमिका साकारली होती. 

Back to top button