ऑफिसला BMCने चिकटवली नोटीस, कंगना म्हणते-'येताना बुलडोजर आणला नाही' | पुढारी

ऑफिसला BMCने चिकटवली नोटीस, कंगना म्हणते-'येताना बुलडोजर आणला नाही'

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या तथाकथित आत्महत्येच्या घटनेनंतर अभिनेत्री कंगना आपल्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता कंगनाच्या मुंबई येथील ऑफिसचे सुरु असलेले काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) थांबवले आहे. कंगनाच्या ऑफिसमध्ये सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हणत बीएमसीने काम थांबवण्याची नोटिस चिकटवली आहे. 

याबाबतच्या एका ट्विटमध्ये कंगनाने माहिती दिली आहे, ‘सोशल मीडियावर माझ्या मित्रांनी मला हे पाठवले आहे. यावेळी  बीएमसीवाले बुलडोजर सोबत घेऊन आले नाही. परंतु, माझ्या ऑफिसमध्ये लीकेजवर सुरू असलेले काम थांबवण्यासाठी नोटिस चिटकवून गेले. मित्रांनो माझे खूप नुकसान होऊ शकते. परंतु, आपल्या सर्वांचे प्रेम आणि समर्थन मिळत आहे.

याआधी कंगना राणावतने तिच्या ऑफिस परिसरात बृहन्मुम्बई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता.

 

Back to top button