#JusticeForRhea रियाच्या समर्थनार्थ आले बॉलिवूडकर | पुढारी

 #JusticeForRhea रियाच्या समर्थनार्थ आले बॉलिवूडकर

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक झाल्यानंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार तिच्या समर्थनार्थ आले आहेत. रियासोबत जो व्यवहार केला जात आहे, ते खूपच चुकीचे आहे, असे म्हणत बॉलिवूडकरांनी रियाच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विट करत लिहिले आहे, ‘ती (रिया) ड्रग्ज घेत नाही. ती फक्त सुशांतसाठी ड्रग्ज उपलब्ध करून द्यायची आणि यासाठी ती पैशांची व्यवस्था करायची. तर या परिस्थितीत जर सुशांतदेखील जीवंत असता तर तोदेखील तुरुंगात असता…’

बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहताने रिया चक्रवर्तीच्या अटकेवर ट्विट करत म्हटले आहे- ‘न आत्महत्येला प्रवृत्त केलं, न मनी लॉन्ड्रींग, न हत्या? आता मला समजलं आहे की, भारतात आतापर्यंत गांजा वैध झालेला नाही.’ 

बॉलिवूड अभिनेत्री बिदिता बेगने म्हटले आहे, ‘रियाला अटक झाली आहे. कृपया आता तर त्या खऱ्या मुद्द्यांकडे लक्ष द्या, ज्या गोष्टीचा सामना आमचा देश करत आहे.’

कुब्रा सैतने लिहिले आहे, ‘हे ब्रह्मांड रियाच्या आई-वडिलांना या कठीण परिस्थितीत शक्ती दे. एनसीबीने अटक केली आहे. ती खुनी नाही…मीडिया सर्कस आपल्या सायंकाळच्या चहाच्या चर्चेबद्दल मी विचार करू शकते.’  

Back to top button