'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी रुग्णालयात दाखल  | पुढारी

'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी रुग्णालयात दाखल 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बालिका वधू आणि बधाई हो फेम अभिनेत्री एक्ट्रेस सुरेखा सीकरी यांना मुंबई क्रिटी केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्या बेशुध्द झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची पर्सनल नर्स (जी घरामध्ये सुरेखा यांची देखभाल करण्यासाठी होती) त्यांना रुग्णालयात घेऊन आली. आता सुरेखा यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुरेखा शुध्दीवर आल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ आहे, असी माहिती मिळाली आहे. 

सुरेखा सीकरी यांनी बालिका वधू मालिकेतून प्रसिध्दी मिळवली होती. या मालिकेत त्यांनी दादी सा ची भूमिका पार पाडली होती. सुरेखा यांनी बधाई हो चित्रपटात देखील अभिनय केला होता. 

 

Back to top button