पाठीमागून वार केला, समोर येण्याची हिंमत नाही : कंगना  | पुढारी

पाठीमागून वार केला, समोर येण्याची हिंमत नाही : कंगना 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबईतील पाली हिल येथील कंगना राणावतचे ऑफिस बीएमसीने जेसीबीच्या सहाय्याने तोडले. अवैध बांधकाम असल्याचे सांगत बीएमसीने केलेल्या या कारवाईनंतर कंगना राणावतने संताप व्यक्त केला आहे. कंगनाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बुधवारी कंगना सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारविरोधात एकामागोमाग एक ट्विट केले होते. एका ट्विटमध्ये तिने म्हटले की, माझ्या पाठीमागून वार झाला, जेव्हा मी फ्लाईटमध्ये होते, समोर येऊन नोटीस देण्याची वा वार करण्याची हिंमत नाही.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी मुंबईत माझ्या घरात आहे. जेव्हा मी विमानात होते, तेव्हा दुश्मनांनी माझ्या पाठीमागून वार केला. समोर बोलण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. समोर येऊन नोटिस देण्याची हिंमत माझ्या दुश्मनांमध्ये नाही. माझ्या आजूबाजूला दुश्मन होते. तरीही काही लोकांनी माझी काळजी घेतली. माझ्यावर सतत प्रेम करणाऱ्या माझ्या लोकांची मी आभारी आहे.’ 

काल ९ सप्टेंबरला बीएमसीने कंगनाच्या ऑफिसवर कारवाई करत अवैध बांधकाम तोडले. २ दिवसांपूर्वी तिला नोटिस देण्यात आली होती. त्यानंतर बीएमसीने ही कारवाई केली. 

Back to top button