'सुशांतची हत्या नाही तर आत्महत्याच' | पुढारी

'सुशांतची हत्या नाही तर आत्महत्याच'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यांची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अकिंता लोखंडे चांगलीच चर्चेत आली. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी ती त्यांच्या कुटुंबासोबत उभी राहिली. दरम्यान, तिने सातत्याने प्रसार माध्यमांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर स्पष्टोक्ती दिली आहे. सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हणाले नाही, असे स्पष्ट करत माझ्या दिवगंत मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी इच्छा अंकितांने पोस्ट शेअर करत व्यक्त केली आहे. 

अंकिताने एक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये तिने सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हणाले नाही. असे स्पष्ट केले आहे. तसेच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती विषयीदेखील भाष्य केले आहे.

काय म्हटले आहे अंकिताने पोस्टमध्ये? 

मला सतत प्रसारमाध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात येत आहे की सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? सुशांतची हत्या झाली असे मी कधीच म्हटले नाही आणि कोणाला दोषीदेखील म्हटलेले नाही. मी कायम माझ्या मित्रासाठी, त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांची साथ देत आहे. त्यामुळे सत्य हे तपास यंत्रणांच्या माध्यमातून समोर यावे. एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि भारताची नागरिक असल्यामुळे मला महाराष्ट्र राज्य सरकार, पोलिस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे अंकिताने स्पष्ट केले आहे.

तसेच, सुशांत ड्रग्स घेत आहे हे माहिती असते तर मी त्याला ड्रग्सपासून परावृ्त्त करण्याचा प्रयत्न केला असता. सुशांत मानसिक तणावाखाली होता हे जगजाहीर होते. तरीही त्याच्या मित्रपरिवाराने त्याला ड्रग्स घेताना थांबवले नाही. असे सांगत अंकिताने रियावर निशाणा साधला आहे.

रियावर पुन्हा प्रश्नांचा भडीमार

जर तुझे इतके प्रेम होते तर त्याला ड्रग्स घेताना अडवले का नाही? असा सवाल अंकिताने उपस्थित केला आहे. स्वतःला खूप त्याच्या जवळची असल्याचे सांगत आहेस तर त्याला डॉक्टरांचा सल्ला घेऊन ड्रग्स घेताना थांबवू का शकली नाहीस. त्याला या सर्वांपासून वाचवण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधयाला हवा होतास. मात्र, तू त्याला ड्रग्स घेण्यासाठी सहकार्य करत राहिलीस, असा आरोपदेखील अंकिताने रियावर केला आहे. 

अनेकांनी मला जाहीरपणे विधवा किंवा सवत असे म्हटले, मात्र मी त्याचीही कधी उत्तरे दिली नाहीत. मी फक्त २०१६ पर्यंत त्याच्यासोबत काय काय झालेलं हे सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे अंकितांने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Back to top button