शिवसेना बनली आहे सोनिया सेना : कंगना | पुढारी

शिवसेना बनली आहे सोनिया सेना : कंगना

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगना राणावतचा हल्लाबोल सुरुच आहे. आता तिने आणखी एक ट्विट करत शिवसेनेवर टिका केली आहे. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज सत्तेसाठी तीच विचारधारा विकून शिवसेना सोनिया सेना बनली आहे, असा आरोप कंगनाने केला आहे.

”ज्या गुंडांनी पाठीमागून माझे घर तोडले त्यांना सिविक बॉडी म्हणू नका. संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका”, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.  

कंगनाने काल मुंबईत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता.  आज माझं घर तुटलंय, उद्या घमंड तुटेल, असे म्हणत कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत कंगना काल घरी पोहोचली. मुंबईत येताच तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. या व्हिडिओत तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. यामुळे राज्यभरात तिच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. 

वाचा अन्य काही महत्वाच्या बातम्या…

पाठीमागून वार केला, समोर येण्याची हिंमत नाही : कंगना 

कोरोनाचं संकट असताना राजकारण करणं दुर्दैवी; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

राफेल आजपासून लढाईसाठी सज्ज, सन्मानाने दाखल होणार हवाई दलात


 

Back to top button