कंगनाचा बोलवता धनी लवकरच समोर येईल : खासदार अमोल कोल्हे  | पुढारी

कंगनाचा बोलवता धनी लवकरच समोर येईल : खासदार अमोल कोल्हे 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष हटवण्यासठी कंगना प्रकरण सुरू असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील अन्य मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी कंगनाला महत्त्व दिल्याचे ते म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते. 

वाचा – शिवसेना बनली आहे सोनिया सेना : कंगना

कंगनाच्या मागे कुणाचे समर्थन आहे, यावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले, कंगनाचा बोलवता धनी लवकरच समोर येईल. माझ्यासाठी आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. कुणाला किती महत्वाचं आहे, हे जनतेला कळतं. त्याबाबत जनता सुज्ञ आहे.

वाचा – पाठीमागून वार केला, समोर येण्याची हिंमत नाही : कंगना 

दरम्यान, कंगनाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येऊन दाखवू, असे आव्हान दिले होते. त्यानुसार, ती मुंबई विमानतळावर येताच मोठ्या संख्येने लोक विमानतळाबाहेर जमले. रिपाइंचे कायकर्ते आणि शिवसैनिक यावेळी आमने-सामने आले. रिपाइंचे कार्यकर्ते कंगनाला समर्थन देण्यासाठी उपस्थित होते. तर शिवसेनेच्या कायकर्त्यांनी कंगना विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कंगना पाकिस्तान चले जाव अशी घोषणा देण्यात आली. कंगनाकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. 

वाचा – कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर बीएमसीचा हातोडा (video)

वाचा – ‘ड्रामा क्वीन’ कंगनाकडून मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख (Video)

 

Back to top button