कंगना राणावत विरोधात मुंबईत गुन्हा दाखल | पुढारी

कंगना राणावत विरोधात मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून हेटाळणी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगना विरोधात वकील नितीन वसंत माने यांनी तक्रार केली आहे.

कंगनाने काल मुंबईत येताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. आज माझं घर तुटलंय, उद्या घमंड तुटेल, असे म्हणत कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तिचे वक्तव्य बदनामीकारक असल्याचे सांगत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत कंगना काल घरी पोहोचली. मुंबईत येताच तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. या व्हिडिओत तिने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. यामुळे राज्यभरात तिच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  

Back to top button