अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य यांचे निधन  | पुढारी

अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य यांचे निधन 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन झाले आहे. ३५ वर्षीय आदित्य पौडवाल हे बर्‍याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आदित्य पौडवाल यांच्या निधनाबद्दल शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्ट केली की, ‘हे ऐकून फार वाईट वाटले! आमचा लाडका आदित्य पौडवाल आता नाही !! मी यावर विश्वास ठेवू शकत नाही! किती आश्चर्यकारक संगीतकार आणि किती सुंदर मनुष्य !! मी नुकतेच एक गाणे गायले आहे जे दोन दिवसांपूर्वी त्यांच्याद्वारे इतके सुंदर प्रोग्राम केलेले होते! फक्त यासह येऊ शकत नाही !! प्रेम करतो भाऊ … तुझी आठवण येते

आदित्य पौडवाल हे आई अनुराधाच्या मार्गावर चालत भजन आणि भक्तीगीते गात होते. त्याचसोबत तो एक उत्तम संगीत दिग्दर्शक होता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आदित्यचे नाव देशातील सर्वात तरुण संगीत दिग्दर्शकाच्या वर्गात समाविष्ट आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून स्टारच्या निधनाच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले आहे. आदित्य पौडवाल यांच्या निधनाने त्यांचे संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला आहे. त्याचबरोबर त्याच्या निधनाने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

 

Back to top button