कंगना राजभवनात गेली, बाहेर येताना 'कमळ' हातात घेऊन आली! (video) | पुढारी

कंगना राजभवनात गेली, बाहेर येताना 'कमळ' हातात घेऊन आली! (video)

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कंगना आणि शिवसेना यांच्यामधील वाद उभ्‍या महाराष्‍ट्रात गाजतो आहे. गेल्‍या काही दिवसांपूर्वी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर ठरवत ते पाडून टाकले. त्‍यावर कंगनाकडून मोठा थयथयाट करण्यात आला. तिने राज्‍य सरकारसह मुख्यमंत्र्यांवर टीका केली. दरम्‍यान आज राजभवनात कंगनाने राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने आपल्‍यावर राज्‍य सरकारकडून कशा प्रकारे अन्याय करण्यात आला याचा पाढा वाचला. 

अधिक वाचा : स्‍वार्थासाठी राजकारण केलं जात आहे : संजय राऊत 

राज्‍यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन बाहेर आल्‍यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली. यामध्ये तिने ‘मी आज राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मी माझ्यावर झालेल्‍या अन्यायाची माहिती त्‍यांना दिली. मला आशा आहे की मला न्याय मिळेल, तसेच सगळ्या नागरिकांचा विशेष करून तरूण मुलींचा व्यवस्‍थेवरील विश्वास पुर्नप्रस्‍थापित होईल.’ राज्‍यपालांनी आपल्‍या मुलीप्रमाणे माझे म्‍हणणे ऐकून घेतले.

अधिक वाचा : उत्तर प्रदेशात योगींचे कार्टून काढल्यास काय होतं माहित आहे : संजय राऊत

राज्‍यपालांच्या भेटीनंतर कंगना जेव्हा बाहेर आली, त्‍यावेळी तिने डोळ्याला काळा गॉगल लावला होता. विशेष म्‍हणजे बाहेर येताना तिच्या हातात कमळ दिसून आले. या भेटीदरम्‍यान कंगनासोबत तिची बहिण रंगोलीही होती. त्यामुळे कमळाच्या फुलाची चर्चा रंगली आहे. 

#WATCH I met Governor Koshyari & told him about unjust treatment I’ve received. I hope justice will be given to me so that the faith of all citizens including young girls, is restored in the system. I am fortunate that the Governor listened to me like a daughter: Kangana Ranaut pic.twitter.com/aZRohVVUhi


— ANI (@ANI) September 13, 2020

Back to top button