ड्रामा क्वीन कंगना राज्यपालांच्या भेटीला! | पुढारी

ड्रामा क्वीन कंगना राज्यपालांच्या भेटीला!

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

एकीकडे कंगना आणि शिवसेनेतील वादामुळे महाराष्‍ट्राचे राजकारण ढवळून निघाले असताना आणि आरोप-प्रत्‍यारोपांच्या फैरी झडत असताना आज बॉलिवूडची क्‍वीन कंगनाने राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. 

बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर जी कारवाई करण्यात आली होती, त्‍या संदर्भात कंगना राज्‍यपालांशी चर्चा करणार असल्‍याचे बोलले जात आहे. एकुणच कंगनाच्या भेटीमुळे शिवसेना आणि कंगनातील वाद कोणत्‍या वळणावर पोहोचेल हे येणारा काळच ठरवेल. कंगना पाली हिलमधील निवासस्‍थानापासून राज्‍यपालांच्या भेटीसाठी बाहेर पडली. दरम्‍यान कंगनाच्या निवासस्‍थानासमोर आंदोलन करण्यात येत असून, या ठिकाणी पोलिस बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.  

Back to top button