कंगना राणावत मुंबईतून निघाली | पुढारी | पुढारी

कंगना राणावत मुंबईतून निघाली | पुढारी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबईतून मनालीकडे जाण्यासाठी तिच्या घरातून निघाली. शिवसेनेवर टिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

काही दिवसांपूर्वीच कंगना मुंबईत आली होती. मुंबई विमानतळावर येताच तिला शिवसैनिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर ती मुंबईतून रवाना होताना विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.    

कंगना आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. गेल्‍या काही दिवसांपूर्वी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर ठरवत ते पाडून टाकले. त्‍यावर कंगनाकडून मोठा थयथयाट करण्यात आला. तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत टिका केली होती. दरम्‍यान, काल कंगनाने राजभवनात राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी तिने आपल्‍यावर राज्‍य सरकारकडून कशा प्रकारे अन्याय करण्यात आला याचा पाढा वाचल्याचे समजते. 

वाचा अन्य काही महत्वाच्या बातम्या…

कंगना राजभवनात गेली, बाहेर येताना ‘कमळ’ हातात घेऊन आली! (video)

होय मला ड्रगची चटक लागली होती असं खुलेआम सांगणाऱ्या ड्रामेबाज कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!

कंगना विरुद्ध शिवसेना : संजय राऊतांची राज ठाकरेंना साद

 

Back to top button