'कंगना त्या सर्वांची तोंडे काळे करून गेली' | पुढारी

'कंगना त्या सर्वांची तोंडे काळे करून गेली'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या बेताल वक्तव्यानंतर राज्यासह मुंबईत वाद रंगला. कंगना आणि शिवसेना यांच्यामधील वाद टोकाला पोहोचला. दरम्यान, कंगना आज मुंबईतून मनालीकडे रवाना झाली आहे. मात्र, तिच्या या भूमिकेवर शिवसैनिकांनी विखारी शब्दांत टिका करत भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत ज्या लोकांनी कंगनाची बाजू घेतली त्यांची तोंडे काळे करून ती गेली असे म्हटले आहे. 

काय म्हटले आहे ट्विटमध्ये? 

‘ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली. आता मारा बोंबा… असे ट्विटमध्ये प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

मनालीला जाता जाता कंगनाचे ट्विट; शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल

प्रताप सरनाईक यांनी केलेल्या ट्विटवर अद्याप कंगनाकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. कंगना आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनाने महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे, असा दावा तिने केला आहे.

त्याचसोबत कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे त्यात लिहिले आहे की, जड अंतकरणाने मी मुंबईतून जात आहे. ज्या रितीने माझ्यावर इतके दिवस हल्ले झाले. शिविगाळ केली, माझ्या कार्यालयानंतर आता घर तोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या चोहोबाजुने हत्यारबंद सुरक्षा यामुळे माझं पीओकेबद्दल बोलणं योग्य होतं, असा उल्लेख तिने पुन्हा एकदा केला आहे.

कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?

 कंगना आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानाने झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असे धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.

अधिक बातम्या वाचा

कंगना राजभवनात गेली, बाहेर येताना ‘कमळ’ हातात घेऊन आली! (video)

होय मला ड्रगची चटक लागली होती असं खुलेआम सांगणाऱ्या ड्रामेबाज कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!

कंगना विरुद्ध शिवसेना : संजय राऊतांची राज ठाकरेंना साद

Back to top button