'कोरोनावर लस काढा अन्यथा तारुण्य संपेल' | पुढारी

'कोरोनावर लस काढा अन्यथा तारुण्य संपेल'

मुंबई: पुढारी ऑनलाईन

सध्या सर्व जगाचे लक्ष हे कोरोनावरील लसीकडे लागले आहे. लस कधी उपलब्ध होणार? याचे नेमके उत्तर अद्याप कोणालाच मिळालेले नाही. बहुतांश देशातील शास्त्रज्ञ लसीचा शोध घेत आहेत. दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा हिने अजब दावा केला आहे. 

मागील आठवड्यात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्यानंतर आता अभिनेत्री मलायका अरोराला सुद्धा कोरोनाची लागण झाली. सध्या मलायका होम क्वारंटाईन असून घरीच उपचार घेत आहे. दरम्यान, तिने इन्स्टाग्रामवर एक स्टेटस शेअर केला आहे. या स्टेटसमध्ये तिने “कोई वॅक्सीन निकाल दो भाई, वर्ना जवानी निकल जाएगी.” अशी पोस्ट केली आहे. तिच्या या अजब पोस्टमुळे सोशल मीडियावर सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मलायकामध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे नसून तिची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती होम क्वारंटाईन झाली आहे. तसेच प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचेही तिने म्हटले आहे. 

Back to top button