काळवीट शिकार : 'हाजिर हो', जोधपूर कोर्टाचे सलमानला आदेश  | पुढारी

काळवीट शिकार : 'हाजिर हो', जोधपूर कोर्टाचे सलमानला आदेश 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काळवीट शिकार प्रकरणी आणि अवैध शस्‍त्र बाळगल्‍याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर जिल्हा आणि सेशन कोर्टाने २८ सप्टेंबरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी सलमानच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी होऊ शकली नाही. यानंतर कोर्टाने सलमानला पुढील सुनावणीसाठी २८ सप्टेंबरला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.  

कोर्टात सलमानकडून अधिवक्ते हस्तीमल सारस्वत उपस्थित होते. तर राजस्थान सरकारकडून पी पी मगाराम उपस्थित होते. या दरम्यान कोर्टाने स्पष्ट केले की, २८ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. यासाठी सलमान खानला कोर्टात सादर व्हावे लागेल. 

काय आहे काळवीट शिकार प्रकरण?  

जोधपूरमध्‍ये १९९८ रोजी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. दरम्‍यान, चित्रपटातील स्‍टार्स म्‍हणजेच सलमान खान, सैफ अली, तब्‍बू, सोनाली बेंद्रे आणि निलम हे जंगलात गेले. तेथे सलमानने काळवीटांची शिकार केली. ही घटना १ आणि २ ऑक्‍टोबर १९९८ रोजी कांकाणी गावात घडली होती. दोन काळविटांची शिकार केल्‍याचा आरोप सलमान खानवर होता. 

अधिक वाचा – ‘काळवीट शिकार प्रकरण’ काय आहे?

 

Back to top button