अक्षयने बियर ग्रिल्ससोबत शेअर केल्या 'त्या' खास गोष्टी   | पुढारी

अक्षयने बियर ग्रिल्ससोबत शेअर केल्या 'त्या' खास गोष्टी  

मुंबई : पुढारी ऑनलाईन  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने डिस्कवरीवरील शो इन्टु द वाईल्ड विथ बियर ग्रिल्सच्या खास एपिसोडमध्ये एन्ट्री केली. इतकेच नाही तर अनेक प्रकारच्या स्टंटसोबत अक्षय कुमारने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीदेखील शेअर केल्या. अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये आपल्या एन्ट्री ते पहिल्या फोटोशूटपर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या. अक्षयने सांगितले की, बॉलिवूडमध्ये ५ मिनिटांच्या भेटीत त्याला ३ चित्रपट मिळाले होते. 

अक्षयने सांगितले की, बॉलिवूडमध्ये त्याने ५ मिनिटांच्या भेटीत ३ चित्रपट साईन केले होते. बेयर ग्रिल्सने अक्षयच्या चित्रपट करिअरविषयी विचारले की, अखेर त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय का घेतली आणि तो अभिनेता कसा बनला? त्यावेळी अक्षयने सांगितले की, ‘मी मुलांना मार्शल आर्ट्स शिकवायचो. तेव्हा माझ्या एका स्टुडंटच्या वडिलांनी मला म्हटले की, तुला मॉडलिंगमध्ये काम करायला हवे.” 

अक्षयने सांगितले की, तो पुरानी दिल्ली त राहत होता. त्याची आई काश्मीरी आहे आणि वडील पंजाबी होते. तो आपल्या वडिलांना रोल मॉडेल मानतो. आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टींवर आयुष्यात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटातील एन्ट्रीबद्दल अक्षयने सांगितलं की, “मी मुलांना मार्शल आर्ट्स शिकवत होतो. तेव्हा माझ्या एका स्टुडंटच्या वडिलांनी मला म्हटले की, तुला मॉडलिंगमध्ये काम करायला हवे. मी एका स्टुडिओमध्ये गेळो आणि तेथे एक मुलगी आली. आम्ही दोघांनी एकत्र पोझ दिले आणि फोटोशूट केले. यानंतर सायंकाळी मला २१ हजार रुपयांचा चेक मिळाला. मला खूप  आश्चर्य वाटलं होतं.’ 

Into the Wild with Bear Grylls preview: Akshay ziplines over river with  crocodiles | Entertainment News,The Indian Express

अक्षय कुमार म्हणाला की, मी विचार केला की, मी मार्शल आर्ट्स शिकवतो आणि मला केवळ ५ हजार रू. मिळतात. परंतु, येथे थोडे फोटोथूट करण्याचे इतके पैसे मिळाले! मला वाटलं की, मला या क्षेत्रात पुढे जायला हवं. परंतु, मी मॉडलिंग अधिक केली नाही.” 

बॉलिवूडमध्ये पहिल्या चित्रपटाविषयी अक्षय कुमार म्हणाला, मी एक दिवस नटराज स्टुडिओत गेलो. तेथे एक व्यक्ती भेटला. त्यांनी मला विचारले की, ‘ॲक्टर होशील? मी म्हणाले हो…तेव्हा त्यांनी माझी भेट दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांच्याशी केली. त्यांनी ५ मिनिटांच्या भेटीत मला तीन चित्रपटांची ऑफर दिली. परंतु, तिन्ही चित्रपट फ्लॉप झाले. चौथा चित्रपट थोडाफार चालला. मग हळूहळू चित्रपट हिट होण्याचा सिलसिला सुरू झाली. आता मी या स्थानी पोहोचलो आहे.” 

Akshay Kumar meets Bear Grylls in the new episode of 'Into the Wild' | The  Business Standard

वेटरचं आयुष्य 

शोमध्ये अक्षयने आपल्या जीवनप्रवासबद्दल सांगितले. वेटर असताना एकदा एका महिलेने टिप म्हणून किस दिला होता. जेव्हा बियर ग्रिल्सने विचारलं की, तो आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणी आठवतो का? यावर अक्षय म्हणाला, आज त्याच्याकडे खूप पैसे आहेत. परंतु, तो आयुष्य बदललं आहे. जे स्वातंत्र्य तेव्हा होत, ते आजदेखील आठवतं. 

Back to top button