कंगनाचा एक्स-बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने म्हटले...   | पुढारी

कंगनाचा एक्स-बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने म्हटले...  

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्सच्या मुद्द्यावरुन खूपच चर्चेत आली आहे. याच दरम्यान कंगना राणावतचा एक्स-बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने कोकेन घेण्यास नकार दिल्याने कंगनाने माझ्याशी भांडण केले असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भातील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे.

अधिक वाचा : सुशांत सिंहचा पहिला मेणाचा पुतळा तयार  

अध्ययन सुमनने एका मुलाखतीत सांगितले की,’गेल्या १२ वर्षांपासून कंगना माझ्या संपर्कात नाही. तर सध्या आम्ही दोघेही एकाच गोष्टीसाठी (सुशांतच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्यासाठी) लढा देत आहोत. यामुळे मी तिचा आदर करतो. तसेच २०१६ च्या मुलाखती दरम्यान चाहत्यांनी अपमान केल्याचे यावेळी त्याला आठवले. त्यावेळी मला अयशस्वी, निराश, अनादर करणारा आणि वाईट सुपरस्टार म्हटले गेले होते. माझा आणि माझ्या कुंटुबाचा अपमान झाला असल्याचे सांगितले.’

अधिक वाचा : सनी लिओनीचा कंगना राणावतला टोला! 

यानंतर अध्ययन सुमन याला कंगनाविषयी विचारल्यानंतर सांगितले की, ‘मी पुन्हा- पुन्हा सांगत आहे की, कंगनाशी माझा काही सध्या संबंध नाही. याआधी ती माझ्याशी कोकेन घेण्यास नकार दिल्याने भांडण करून निघून गेली होती. तर सध्या आम्ही जीवनातील अशा एका टप्प्यांवर पोहोचलो आहोत की, जेथे आम्ही एकमेकांविरूद्ध नसून एकत्र आहोत. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याचा पाठपुरावा करण्यासाठी माझे वडील आवाज उठवत आहे. तसेच कंगणाही करत आहे.’  

 

Back to top button