ज्येष्ठ अभिनेत्री आशालता रुग्णालयात दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’ या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होते. येथील सेटवरील २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.