ड्रग्ज प्रकरण; एनसीबीकडून दीपिकाची होणार चौकशी | पुढारी

ड्रग्ज प्रकरण; एनसीबीकडून दीपिकाची होणार चौकशी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी निगडित ड्रग्ज प्रकरणासंदर्भात क्षणाक्षणाला नव्या गोष्टींचा उलगडा होत आहे. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यात ड्रग्जवरून झालेला संवाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) विभागाच्या हाती लागला आहे. या पार्श्वभूमीवर मॅनेजर करिश्माला चौकशीसाठी एनसीबीने बोलावले असून दीपिका पदुकोणलाही चौकशीसाठी लवकरच बोलवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सुशांतची प्रेमिका रिया चक्रवर्ती हिने चौकशीत श्रद्धा आणि साराची नावे घेतली आहेत. दुसरीकडे, रिया हिची मॅनेजर जया साहा हिची सोमवारी चौकशी झाली. तिच्यासह व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर ‘डी’ आणि ‘के’ नावाने ड्रग्जसंदर्भात बोलणे झाल्याचे समोर आले आहे. ‘डी’ नावाने बोलणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण असल्याचे मानण्यात येत असून, ‘के’ नावाने २००० मधील आघाडीची अभिनेत्री बोलत असल्याचे समजले जात आहे. ‘डी’ला काहीही करून ‘माल’ (ड्रग्ज) हवा आहे… आणि ‘के’ तिच्यासाठी त्याची तजवीज करणार आहे, असे या संवादातून समोर आलेले आहे. ऑक्टोबर २०१७ मधील हा संवाद आहे.

दीपिकासह सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनाही एनसीबीकडून समन्स बजावण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती हिने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात २५ सेलिब्रिटजची नावे समोर आली आहेत. 

Back to top button