ड्रग्ज प्रकरण: रियाच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ | पुढारी

ड्रग्ज प्रकरण: रियाच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी निगडित ड्रग्ज प्रकरणात कारवाईला सामोरे जाणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर सहा आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने आज या प्रकणावर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच तिच्यासह इतर सहा आरोपींना ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 

सत्र न्यायालयाने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह सर्व आरोपींचा जामीन अर्ज  फेटाळला. रियाच्या जामीन अर्जाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने विरोध केला होता. रियाला जामीन मिळाल्यास ती तपासावर परिणाम करू शकते, असा युक्तिवाद एनसीबीने न्यायालया समोर मांडला. रियाच्या वकिलांनी यानंतर विविध युक्तिवाद सादर केले. 

सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआय करीत आहे. त्यादरम्यान सीबीआयला सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा संबंध अमली पदार्थांशी असल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे एनसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याअंतर्गत एनसीबीनेच रिया व शौविकसह अन्य संबंधितांना अटक केली आहे. तसेच काही दलालांनाही अटक केली आहे.

Back to top button