अभिनेत्री पूनम पांडेची पतीविरोधात मारहाण, विनयभांगाची तक्रार  | पुढारी

अभिनेत्री पूनम पांडेची पतीविरोधात मारहाण, विनयभांगाची तक्रार 

काणकोण : पुढारी ऑनलाईन

सिनेअभिनेत्री पूनम शोभानाथ पांड्ये (वय 29, रा. ठाणे) हिने काणकोण येथे मारहाण तसेच विनयभंग केल्याची पती चित्रपट दिग्दर्शक साम अहमद बाँबे (46) याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीस अनुसरून काणकोण पोलिसांनी गुन्हा नोंदवून  साम बाँबे याला अटक केल्याची माहिती काणकोण पोलिसांनी दिली.

ठाणे येथील रहिवासी असलेली पूनम पांडे सध्या पाळोळे येथील एका हॉटेलमध्ये चित्रीकरणाच्या निमित्ताने वास्तव्यास असून सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास साम यांनी  आपल्याला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी लेखी तक्रार तिने दाखल केली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर रोजी पूनम पांडेचा साम अहमदशी विवाह झाला आहे.काणकोण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र एम. नाईक पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button