ड्रग्ज प्रकरणात नाव येताच दिया म्हणाली... | पुढारी

ड्रग्ज प्रकरणात नाव येताच दिया म्हणाली...

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. या प्रकरणात क्षणक्षणाला नवी नावे समोर येत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या नावा नंतर आता दिया मिर्झा हिचं देखील नाव समोर आले आहे. मात्र, तिने यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावत मी कायदेशीर मार्गाने या आरोपांचे खंडन करेन, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. 

काय म्हणाली आहे दिया

दिया मिर्झाने एकामागोमाग ट्विट करत ड्रग्ज यादीत आलेल्या नावाप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. ”आयुष्यात कधीही मी अंमली पदार्थ किंवा प्रतिबंधक पदार्थांचं सेवन केलेले नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपाचे खंडन करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार.” अशा आशयाचे ट्विट दियाने केले आहे.

 या ट्विटपूर्वी तिने दोन ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.” ही बातमी खोटी आहे. चुकीच्या हेतुने माझे नाव घेतले जात आहे त्यामुळे माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे मी खंडन करू इच्छिते. तसेच,  या असल्या फालतू आरोपामुळे माझी प्रतिष्ठा मलिन होत आहे. आत्तापर्यंत मेहनत करून कमावलेले नावाला या आरोपामुळे डाग लावला जात आहे. अशी खंतदेखील दियाने ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. 

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान…

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावे समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचे समोर आले आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत.

Back to top button