बबड्याची आई कोरोनाबाधित! मालिकांच्या सेटवरील कोरोना संसर्ग सुरुच | पुढारी

बबड्याची आई कोरोनाबाधित! मालिकांच्या सेटवरील कोरोना संसर्ग सुरुच

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अगं बाई सासूबाई मालिकेतील प्रमुख पात्र साकारणाऱ्या निवेदित सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होते. येथील सेटवरील २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी कोरोनामुळे साताऱ्यात निधन झाले. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी पहाटे ४.४५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आशालता यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली हाेती. साताऱ्यात आशालता यांचे चाहते रुग्णालयाबाहेर आणि संगममाहुली येथे ही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

अधिक वाचा:

ड्रग्ज प्रकरणात नाव येताच दिया म्हणाली…

ड्रग्ज प्रकरण: दीपिका-करिश्मात काय झालं बोलणं?

सोनाक्षी सिन्हासह ४ जण ‘त्या’ पार्टीत!

Back to top button