काळजी घ्या म्हणत सुबोध भावेचा ट्विटरला रामराम! | पुढारी

काळजी घ्या म्हणत सुबोध भावेचा ट्विटरला रामराम!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

मराठी सिनेसृष्टीचा आघाडीचा कलाकार सुबोध भावे स्वतःचे अधिकृत ट्विटर अकाऊंट डिलीट करत असल्याची घोषणा केली आहे. यासंबंधी त्याने स्वतः ही माहिती अखेरचे ट्विट करत दिली आहे. गेल्या काही दिवसापासून सुबोध, त्याची पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती. हे तिघेही होम क्वारंटाईन घरीच उपचार घेत आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या काळात सुबोधने सोशल मीडियाद्वारे आपला संपर्क चाहत्यांशी ठेवला होता. मात्र, अचानक ट्विटरला सुबोधने राम राम ठोकण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या नकारत्मकतेमुळे त्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. 

सुबोध भावे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड मत व्यक्त करत असे. मात्र, अचानक ट्विट अकाऊंट डिलिट करण्याचा निर्णय घेत आपल्या ”सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र जय हिंद” अशा आशयाचे ट्विट सुबोधने केले आहे. 

सध्या तो काय करत आहे    

‘शुभमंगल ऑनलाइन’च्या माध्यमातून एक हलकीफुलकी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे”, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावेनं त्याने निर्मित केलेल्या पहिल्यावहिल्या मालिकेचं वर्णन केले. ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे सुबोधची ही मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सायली संजीव आणि सुयश टिळक अशी नवीन जोडी मुख्य भूमिकेत आहे.

अधिक वाचा

तर कंगनाची चौकशी झाली पाहिजे; भाजपनेच केली मागणी!

बबड्याची आई कोरोनाबाधित! मालिकांच्या सेटवरील कोरोना संसर्ग सुरुच

ड्रग्ज प्रकरणात नाव येताच दिया म्हणाली…

Back to top button