तर कंगनाची चौकशी झाली पाहिजे; भाजपनेच केली मागणी! | पुढारी

तर कंगनाची चौकशी झाली पाहिजे; भाजपनेच केली मागणी!

मुंबई : पुढारी ऑनलाईन   

कंगना रानावत जर ड्रगबाज होती असं बोलली असेल तर त्याबाबतची चौकशी झाली पाहिजे, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले.

यावेळी प्रविण दरेकर म्हणाले, कंगना १००  टक्के ड्रगिस्ट होती, असं बोलली असेल तर चौकशी झाली पाहिजे. आपल्या वैभवशाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर नवोदीत कलाकार येणार असतील व त्यांना ड्रग्जचे व्यसन जडणार असल्याचं दिसत असेल, तर कुणीही याला पाठिशी घालायचं कारण नाही. कंगनाच्या माध्यमातून विषय जर ऐरणीवर आला असेल, एवढी मोठी आपली फिल्म इंडस्ट्री आहे व त्यात जर ड्रग्जचे व्यसन जडत असेल, तर आपण काळजी घ्यायला नको का? असे दरेकर म्हणाले. 

Back to top button