क्रिकेटपटूंच्या पत्नी, स्टार्स ड्रग्जचे सेवन करतात; शर्लिन चोप्राचा मोठा गौप्यस्फोट | पुढारी

क्रिकेटपटूंच्या पत्नी, स्टार्स ड्रग्जचे सेवन करतात; शर्लिन चोप्राचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडनंतर आता क्रिकेट वर्तुळावर ड्रग्ज सेवनाचा आरोप होत आहे. पार्ट्यांमध्ये बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटूंच्या पत्नी ड्रग्जचे सेवन करतात, असा धक्कादायक खुलासा बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंच्या पत्नी ड्रग्ज घेतात. बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीही ड्रग्जचे सेवन करताना स्वत: मी पाहिले आहे, असेही शर्लिनने म्हटले आहे. ती एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जण स्टार्स आणि क्रिकेट विश्वातील काही जण ड्रग्ज घेत असल्याची कबुली शर्लिनने दिली आहे. कोण ड्रग्ज घेत होतं, याची माहिती मी एनसीबीला देईन, असेही ती म्हणाली.

शर्लिन म्हणाली, केकेआरची मॅच पाहायला मी कोलकाता येथे गेले होते. मॅचनंतर आफ्टर मॅच पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीमध्ये मी पाहिलं की, क्रिकेटर्स, बॉलिवूडचे काही सेलेब्स ड्रग्जचे सेवन करत होते. तेथे सर्वांसोबत मी डान्स आणि मस्ती केली. मी डान्स करता करता खूप थकले होते. तेव्हा मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेले. तेथे जे सुरू होतं ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. आमच्या क्रिकेट सुपरस्टार्सच्या पत्नी कोकिन स्नॉट करत होते. मला पाहून त्यांनी स्माईल केली. मीदेखील स्माईल केली आणि तेथून निघाले. मला वाटलं की, मी चुकीच्या ठिकाणी आले आहे. त्यानंतर मी पाहिलं की, सर्व जणांच्या गप्पा रंगल्या होत्या. पार्टी करत होते. काही क्रिकेट्सच्या गर्लफ्रेंड्सदेखील ड्रग्ज घेत होत्या. एकानंतर एक अशा पार्ट्या होत राहतात.”

शर्लिनने अप्रत्यक्षपणे किंग खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणवर निशाणा साधला. बॉलिवूडमध्ये ज्या मोठ्या पार्ट्या असतात, तेथे ड्रग्जचे सेवन होते. कोण कोण ड्रग घेत, हे सर्वांना माहिती आहे. किंग खान काय सेवन करतात, कसे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. ड्रग्जच्या सेवनामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती, असा गंभीर आरोप शर्लिनने या स्टार्सवर केला होता. मात्र, शर्लिनने कुठल्याही क्रिकेटर किंवा त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केला नाही. 

Back to top button