रकूल प्रीत सिंह एनसीबी कार्यालयात दाखल | पुढारी

रकूल प्रीत सिंह एनसीबी कार्यालयात दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आज सकाळीच दाखल झाली. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले. यात रकूल प्रीत सिंहचे नाव समोर आले आहे. याआधी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी एनसीबीने रकूलला समन्स पाठवले होते. 

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. यानुसार, रकूल प्रीत सिंहची चौकशी आज होणार आहे. यासाठी ती सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा आणि रकूलचा उल्लेख केला होता.

रकूल प्रीतसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिचीदेखील चौकशी होणार आहे. सध्या ती ही एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. यानंतर शनिवारी (२६ सप्टेंबर) रोजी दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे.  

अधिक वाचा : अभिनेत्री दीपिका पदुकोण उद्या ‘एनसीबी’समोर हजर

‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या पार्टीत ड्रग्जची लयलूट 

Back to top button