एनसीबी चौकशीत दीपिकासोबत राहू द्या, रणवीरची विनंती  | पुढारी

एनसीबी चौकशीत दीपिकासोबत राहू द्या, रणवीरची विनंती 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्स अँगल समोर येत आहेत. रिया चक्रवर्ती आणि इतर काही बॉलिवूड स्टार्सची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. त्यामुळे अनेक बडे सेलेब्स एनसीबीच्या रडारवर आहेत. सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोणला एनसीबीने समन्स पाठवले आहे. यांची २६ सप्टेंबरला चौकशी होणार आहे. एनसीबी दीपिकाची शनिवारी चौकशी करणार आहे. परंतु, त्याआधी अभिनेता रणवीर सिंहने एनसीबीकडे एक विनंती केली आहे. चौकशीदरम्यान, दीपिकासोबत हजर राहता यावं, यासाठी रणवीरने एनसीबीकडे विनंती केली आहे.

दीपिकाला कधी-कधी भीती आणि पॅनिक ॲटॅक येतो. त्यामुळे चौकशीवेळी पत्नीसोबत राहण्याची परवानगी मिळावी, असे रणवीर सिंहने एनसीबीला म्हटले आहे. रणवीरने म्हटे आहे की, त्याला माहिती आहे की, कायदेशीर नियमांमुळे तो चौकशीवेळी तेथे उपस्थित राहू शकत नाही. परंतु, एनसीबी कार्यालयात येण्याची परवानगी मिळावी. एनसीबीकडून आतापर्यंत या मागणीवर एनसीबीकडून कुठलेही उत्तर आलेले नाही.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह गुरुवारी रात्री गोव्यातून मुंबईला पोहोचले. एनसीबीने २०१७ च्या व्हॉट्सॲप चॅटच्या आधारावर चौकशीसाठी बोलावलं आहे. हे चॅट टॅलेंट एजेंट जया साहाच्या मोबाईल फोनमधून एनसीबीला मिळाले आहेत. जया साहा अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी टॅलेंट मॅनेजर होती. जया साहाची चौकशी केल्यानंतर अनेक खुलासे झाले. त्यामुळे आता बॉलिवूडचे बडे दिग्गज सेलेब्स एनसीबीच्या निशाण्यावर आहेत. 

 

Back to top button