शाहरुख, करण जोहरही आता एनसीबीच्या रडारवर | पुढारी

शाहरुख, करण जोहरही आता एनसीबीच्या रडारवर

मुंबई : वृत्तसंस्था

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची दिशा आता चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शनकडे वळली आहे. धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद आणि सहायक दिग्दर्शक अनुभव चोपडाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, क्षितिजच्या चौकशीमुळे करण जोहरबरोबरच अभिनेता शाहरुख खानच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, करण जोहरच्या घरी 27 जुलै 2019 रोजी झालेली पार्टी एनसीबीच्या रडारवर आहे. या पार्टीत ड्रग्जचा वापर झाल्याचा संशय एनसीबीला आहे. त्यामुळे या पार्टीला उपस्थित असलेले कलाकारही  अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्टीत दीपिका पदुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विकी कौशल यांसारखे अनेक कलाकार सहभागी झाले होते.

Back to top button