आणि दीपिका आणि श्रद्धाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला सपशेल गंडवलं! | पुढारी

आणि दीपिका आणि श्रद्धाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला सपशेल गंडवलं!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव आल्याने आज तिची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. दीपिका सकाळी १० वाजता एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली. परंतु,चौकशीसाठी जाण्याआधी मीडियाच्या कॅमेऱ्यापासून ती दूर राहिली. खरं तरं, दीपिकाला मीडियासमोर यायचं नव्हतं, यासाठी तिने आपली राहण्याची जागाही बदलली होती. त्याचबरोबर, श्रद्धा कपूरदेखील साध्या गाडीतून दुसऱ्या मार्गाने एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे. श्रद्धाची सुद्धा थोड्या वेळात चौकशी होणार आहे. 

एनसीबी गेस्ट हाऊसजवळ मुंबई पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. येथे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. श्रद्धा कपूरनेही दीपिकाप्रमाणेच पर्याय वापरला. ती एका साध्या गाडीमधून दुसऱ्या मार्गाने एनसीबीच्या ऑफिसमध्ये दाखल झाली.

वाचा – आणि दीपिका आणि श्रद्धाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला सपशेल गंडवलं!

दीपिकाची मॅनेजर करिश्मासोबतचे तिचे ड्रग्ज चॅट व्हायरल झाले होते. या व्हॉट्सॲप चॅटमध्ये दीपिकाचे ड्रग्जविषयीचे बोलणे होते. ज्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये दीपिका आणि करिश्मा यांचे संभाषण सुरू होते. दीपिका त्या ग्रुपची ॲडमिन होती. दीपिका, गोवामध्ये शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मग्न होती. तेव्हा ड्रग्स प्रकरणात तिचे नाव समोर आले होते. दीपिका पादुकोणसह एनसीबीने सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवलं होतं. दीपिकाची शुक्रवार दि. २५ रोजी चौकशी होणार होती. परंतु, गुरुवारी रात्री ती गोव्याहून मुंबईत पोहोचली. त्यामुळे आज दि. २६ रोजी तिची एनसीबीकडून चौकशी होत आहे.  

वाचा –  दीपिका, श्रद्धा, साराची आज चौकशी! ‘गँग ऑफ गांजापूर’मधील आणखी कोणाची पोलखोल होणार?

दुसरे म्हणजे, सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्रीच दीपिका आपल्या घरी न राहता एका हॉटेलमध्ये शिफ्ट झाली होती. त्यामुळे मीडिया कॅमेऱ्याच्या गर्दीपासून ती आपसूक वाचली. शिवाय, ती एका साध्या गाडीतून एनसीबी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली. आता दीपिकाची दोन तासांहून अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, दीपिकाचा मोबाईल फोन एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आहे आहे. 

वाचा – ड्रग्ज चॅटसंबंधी ग्रुपची दीपिका होती अ‍ॅडमिन

वाचा – दीपिका अडकल्यास ‘त्यांना’ ६०० कोटींचा चुना!

Back to top button